Amalner

Amalner: न प ने बनविलेले खराब केलेले रस्ते पुन्हा बनवावे.. मनसेचे निवेदन

Amalner: न प ने बनविलेले खराब केलेले रस्ते पुन्हा बनवावे.. मनसेचे निवेदन

अमळनेर न.पा.ने भुयारी गटारी चे काम करुन नूतन डांबरीकरण करून बनवलेले निकृष्ट रस्ते त्या रस्त्याचे नूतन डांबरीकरण करावे अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करावे लागेल .

काही महिन्यापूर्वी अमळनेर शहरात पाच पावली पासून तर शिरूड नाका वड चौक व शहरात जिथे पण भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर नंतर रस्त्यांना पडलेले खड्डे व परत ते जेमतेम बुजवले व पावसाळा सुरू होताच बुजवलेले खड्डे पुन्हा खचू लागले विविध शाळांकडे जाणारा रस्ता असल्याने येथून लहान बालके जात येत असतात एखादा मुलगा किंवा वृद्ध व्यक्ती या खड्ड्यात पूर्णपणे पडून जीवनाशी जाऊ शकतो एवढे खड्डे या ठिकाणी पडले आहेत वानधारक तसेच लहान मुलं व वृद्ध यांना येथून वापरणे कठीण झाले आहे सर्व रस्ते प्रचंड रहदारीच्या असून इथे अनेक शाळा देखील आहेत शाळेत करून मुले मोठ्या प्रमाणावर वापरतात त्यामुळे रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता या रस्त्याचे नूतन डांबरीकरण करावे अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल असे निवेदन न.पा.मुख्य अधिकारी यांना देण्यात आले निवेदन देताना. तालुका अध्यक्ष संदीप पाटील काटे शहराध्यक्ष धनंजय साळुंखे विजय पाटील (तालुकाध्यक्ष रस्ते आस्थापना) शहर उपाध्यक्ष करण पाटील शहर सचिव निलेश भावसार वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी संकेत पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button