Pandharpur

इसबावीतील अंतर्गत रस्त्यांची दैनिय अवस्था नागरिकांमधुन तीव्र नाराजी

इसबावीतील अंतर्गत रस्त्यांची दैनिय अवस्था नागरिकांमधुन तीव्र नाराजी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी प्रभाग क्रमांक बारा मधिल अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे नागरिकांनी मागणी करूनही पंढरपूर नगरपरिषद त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे तर काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके असलेले डांबरीकरणाचे रस्ते गेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर केलेले त्यामुळे त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असुन नागरिकांना त्या रस्त्यांवरून ये-जा करत असताना नाहक ञास सहन करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकांमधून पंढरपूर नगरपरिषद व येथिल स्थानिक नगरसेवक यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
निदान अतातरी गतवेळी प्रमाणे नगरपरिषद निवडणुक तोंडावर आलेली असताना नागरीहित डोळ्यासमोर ठेवून ना – का होईना परंतु पंढरपूर नगरपरिषद पंच्चवार्षिक निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन तरी का होईना रस्त्यांची कामे केली जावीत ही अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button