Faijpur

फैजपूर ते सावदा रस्त्याची परिस्थिती बिकट

फैजपूर ते सावदा रस्त्याची परिस्थिती बिकट

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील सार्वजनिक सावदा बांधकाम उप विभागापासून तर धनाजी नाना महाविद्यालयापर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे याला कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झालेला असून सतत वाढत्या ट्रक्स थांबतअसल्या मुळे सावदा वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून तसेच सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे

सावदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागापासून तर धनाजी नाना महाविद्यालया फैजपुर पर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून दररोज या रस्त्याने उभे असलेल्या ट्रक्स आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग असल्याने यारस्त्याने दररोज शेकडो प्रवासी वाहनांची वर्दळ सुरू असते सावदा ते फैजपूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने या रस्त्याने अनेक अपघात झालेले आहे सावदा ते फैजपूर प्रमुख्याने धनाजी नाना महाविद्यालयासह अनेक शिक्षण संस्था असून हजारो विद्यार्थी रावेर ते यावल या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करीत आहे
या रस्त्याने वेगवेगळ्या वाहनाने प्रवास करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना वाहतुकीमुळे अडथळा होत असल्याने जीव मुठीत घेऊन शिक्षणासाठी यावे लागत असून या ठिकाणी दोन्ही बाजूने सतत उभ्या असलेल्या ट्रक्स आणि सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागापासून रस्त्याची या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली असून सावदा येथील वाहतूक पोलीस सतत उभ्या असलेल्या ट्रक्सवरती कारवाई का करीत नाही असा प्रश्न असून तसेच सार्वजनिक उपविभाग यांनी बिकट झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button