Mumbai

Mumbai: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय राज्यात पुन्हा कडक निर्बंध; वाचा काय आहे नियम

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय राज्यात पुन्हा कडक निर्बंध; वाचा काय आहे नियम

नाशिक प्रतिनिधी । सुशिल कुवर

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या चौपटीने वाढलेली असतानाच आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचे सांगितले आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

असे असतील नियम

१. सकाळी पाच वाजेपासून रात्री ११ पर्यंत ५ पेक्षा अधिक नागरिकांना प्रवास करून नये

अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत सर्व बंद राहील.

२. शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी आवश्यक

३. शासकीय कामासाठी गरज असल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स पर्याय वापरावा

४. मुख्यालयाच्या बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तींनी बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्यात

५. शासकीय कार्यालयात कमीत कमीत संख्येत काम करावे जास्तीत जास्त संख्येने घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे

६. संसर्ग रोखण्यासाठी वर्तन पाळावे त्याचे पालन हेड ऑफिसने करावे

७. थर्मल स्कनर, सनीटायझर गरजेचे

८. खासगी ऑफिससेस ५० टक्क्यांनी काम करतील

९. खासगी ऑफिसेस सोयीस्कर वेळा ठरवाव्यात

१०. शिफ्टमध्ये २४ तास कामे करण्यास हरकत नाही

११. नियमित हालचाल ऑफिससाठी आवश्यक असल्यास ओळखपत्र बंधनकारक

१२. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी

१३. पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांनी कार्यालयात यावे

१४ लग्नासाठी ५० नातलगांची उपस्थिती बंधनक्रारक

१५ .अंत्यविधीसाठी २० नागरिकांची उपस्थिती

१६ इतर सांस्कृतिक कार्यक्रम ५० नागरिकांची उपस्थिती

१७. शाळा कॉलेजेस कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

१८. शाळा आणि कोचिंग क्लासेसने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु ठेवावा

१९. कार्यालयीन कामकाज चालू राहील

२०. जिम, स्पा, स्विमिंग पूल, वेलनेस सेंटर, ब्युटी सलून पूर्णपणे बंद

२१. हेअर कटिंग ५० टक्क्यांनी सुरु राहतील

२२. हेअर कटिंग सलून रात्री १० ते सकाळी ७ बंद राहतील करोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक

२३. क्रीडा स्पर्धा बंद

२४. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्वनियोजित असतील, त्यास प्रेषक नसतील आणि खेळाडू आणी कार्यालयीन स्टाफला बायोबबल गरजेचे असेल

२५. राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारत सरकारने नियम लागू

२६. दर तिसऱ्या दिवशी RTPCR किंवा Antigen बंधनकारक

२७. पार्क, झु, म्युझियम, किल्ले, पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद

२८. शॉपिंग मॉल मार्केट, कॉम्प्लेक्स ५० टक्क्यांनी सुरु राहतील Antigen test करणे गरजेचे तर रात्री १० ते सकाळी ८ पूर्णपणे बंद

२९. हॉटेल्स, रेस्टारंट ५० टक्यांनी सुरु, लसीकरण गरजेचे, होम डिलिव्हरी सुरु राहील

३०. आंतरराष्ट्रीय प्रवास भारत सरकारच्या नियमाप्रमाणे लागू

३१. मालवाहतूक कार्गो वाहतूक, सार्वजिक वाहतूक केवळ लसीकरण झालेल्या व्यकींच्या मार्फतच होईल

३२. स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या नियमाप्रमाणे लागू असतील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button