Nandurbar

पोलीसांच्या ताब्यातुन पळालेल्या आरोपीतास ४८ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पोलीसांच्या ताब्यातुन पळालेल्या आरोपीतास ४८ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नंदुरबार फहिम शेख

दिनांक 20/10/2021 रोजी सायंकाळी 07.30 वा. सुमारास शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 790/2021 भा. द. वि. कलम 379 मधील अटकेतील आरोपी नामे राजा कपुरदास बैरागी वय-20 रा. आमोदे ता. शिरपुर जि. धुळे यास ग्रामीण रुग्णालय, म्हसावद येथे नियमीत वैद्यकिय तपासणी करीता आणले असता आरोपी राजु हा पोलीसांच्या हाताला झटका मारुन ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथुन पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला म्हणुन म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार तसेच इतर वरिष्ट अधिकाऱ्यांनी तात्काळ म्हसावद पोलीस ठाणे गाठुन माहिती घेतली. घडलेला प्रकार अतिशय गंभीर होता, म्हणून मा. पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अमंलदारांचे तसेच शहादा पोलीस ठाणे आणि म्हसावद पोलीस ठाणे यांचे वेगवेगळे 5 पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले. वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेची पथके शिरपुर, धुळे, नागपुर येथे रवाना केले. समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबत माहिती प्रसारीत करण्यात आली, परंतु कोणत्याही पथकाला आरोपी ताब्यात घेणेबाबत यश मिळत नव्हते. दिनांक 21/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना एका अनोळखी इसमाने फोनद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांच्या ताब्यातुन पळालेला आरोपी सारखाच दिसणारा एक इसम जळगांव येथे फिरत असल्याचे सांगितले, परंतु त्याने इतर कोणतीही उपयुक्त माहिती दिली नाही. सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक जळगांव येथे रवाना केले. मिळालेली माहिती अतिशय त्रोटक स्वरुपाची होती त्यामुळे पथकाला आरोपीताचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हार न मानता जिद्दीने व अहोरात्र मेहनत घेवून जळगांव जिल्ह्यातील सावदा येथे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली सदर ठिकाणी बातमीदार तयार करुन आरोपीताचा शोध घेतला असता आरोपी नामे राजा कपुरदास बैरागी हा दिनांक 23/10/2021 रोजी मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर झोपलेला स्थितीत होता, परंतु त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो पळुन जावु लागला. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले व नंदुरबार येथे आणून पूढील कारवाईकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, यांचे पथकाने केली असुन मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button