Faijpur

खानापूर येथे शेतकरी मेळावा व क्षेत्र दिन संपन्न.

खानापूर येथे शेतकरी मेळावा व क्षेत्र दिन संपन्न.

सलीम पिंजारी

कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत रावेर तालुक्यातील खानापूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकावरील समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात आला होता . या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला .एकूण २५ एकर क्षेत्रावर हरभरा पिकाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली होती . त्यानिमित्त शेतकरी मेळावा व क्षेत्र दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रकल्प अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची राज विजय 202-3 या जातीचे बियाणे,बीजप्रक्रिया करिता जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आल्या होत्या.कार्यक्रम अध्यक्ष म्हणून डॉ.सुरेश पाटील उपस्थित होते.खानापूर येथे शेतकरी मेळावा व क्षेत्र दिन संपन्न.यावेळेस लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी केलेली लोकविकासाची कामे व मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सुरू केलेले शेती विषयक उपक्रम या बाबत माहिती दिली व शेतकऱ्यांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा सल्ला दिला. या क्षेत्र दिन प्रसंगी मा.श्रीमती.रंजनताई पाटील (अध्यक्ष,जि.प,जळगांव)यांनी प्रक्षेत्र भेट देऊन चर्चा केली.तांत्रिक चर्चा सत्रात मार्गदर्शक म्हणून श्री.संजय महाजन( प्रमुख, के व्ही के) यांनी बियाणे बँक तयार करणे माहिती दिली. श्री.महेश वि महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण) यांनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प व हरभरा पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातुन प्रात्यक्षिक बाबत माहिती करून दिली. तसेच श्री.सी टी माळी (बी टी एम)यांनी कृषी प्रक्रिया बाबत माहिती दिली त्याचप्रमाणे श्री.एल ए पाटील (कृषी अधिकारी,प स,रावेर ) यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून गट शेतीच्या माध्यमातून प्रगती करावी असा मानस व्यक्त केला.तूर पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर श्री.शुभम पाटील,श्री.कुमार नरवाडे,श्री.बाळू सर,श्रीमती.चौधरी(उपसरपंच, खानापूर) तसेच सावित्रीबाई महिला बचत गट,राणी लक्ष्मी बाई महिला बचत गटाच्या लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज कोळी व महिला गटाच्या सदस्यांनी येथील मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button