Amalner

32 गावांचा अति वृष्टीच्या सानुग्रह प्रश्न प्रलंबितच..!आमदारसाहेब 32 गावांचे पालुपद पडणार महागात..!तुमचा राजकीय बाजार हीच गावे उठविणार..

32 गावांचा अति वृष्टीच्या सानुग्रह प्रश्न प्रलंबितच..!आमदारसाहेब 32 गावांचे पालुपद पडणार महागात..!– अतिवृष्टिबाधीत शेतकर्‍यांना सानुग्रहाबाबत अद्यापही दिलासा नाही– उद्घाटन, भूमिपूजन करतायं सानुग्रह अनुदाना संदर्भात कधी बोलणार..– 32 गावांचे पालुपद महागात पडणार, तुमचा राजकीय बाजार हीच गावे उठवणार

अमळनेर ः सन 2019(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित अमळगावसह
तालुक्यातील 52 गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी 20 हजार 400 रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.

त्यांनतर जुलैमध्ये बाधीत 20 गावांना सानुग्रह प्राप्त झाला असून अजूनही उर्वरित 32 गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. याबाबत प्रांताधिकारी, आमदार, मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आधीच्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्त कार्यालयाकडे उशिराने म्हणजे 26 मे रोजी पाठविण्यात आल्याने विलंब झाला. आयुक्त कार्यालयाने
जूनमध्ये मत्रांलयाकडे याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानंतर हे प्रकरण
अर्थविभागाकडे प्रलंबित आहे. अर्थमंत्र्यांच्या टेबलवर हे प्रकरण असून त्यांची स्वाक्षरी झाली की सानुग्रह मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.ह्या संदर्भात निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.मात्र, कोकणसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टिमुळे हाहाकार उडाला आहे. संपूर्ण मंत्रीमंडळ पूरग्रस्त भागाला भेटी देत आहेत. त्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या सानुग्रहाचा प्रश्‍न अजून काही दिवस तरी सुटण्यासारखा नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत.

दोन वर्षांपासून अतिवृष्टिचा सानुग्रह मिळाला नसून या खरिपात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली असून कोरडा दुष्काळ आहे. ओला असो का कोरडा तो दुष्काळच असतो. कोकणसह बाधीत जिल्ह्यांना मदतीचा ओघ सुरू आहे ही चांगली व माणुसकीची गोष्ट आहे. मात्र,येथील शेतकरी सुद्धा ओल्या आणि हल्ली कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करत आहे.कोकणवासीयांएवढीच येथील शेतकरी देखील होरपलळा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागील जखमांवर अजून मलम लावण्यात आले नाही त्यात आता नव्या ताज्या जखमा झाल्या आहेत.

आमचे आमदार, खासदार आमच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नी सजग नाहीत. त्यांचा शेतकर्‍याविशयीचा कळवळा बेगडी आहे. स्वंयघोषित भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील हे 32 गावांच्या सानुग्रहाचे काय झाले? कुठपर्यंत प्रकरण आले? असा प्रश्‍न कोणी विचारल्यास कमालिचे उद्विग्न होतात. काय तेच ते 32 गावांचे पालुपद अशी निर्भत्सना करत ते विचारणार्‍याचा अपमान करतात. तथाकथित भूमिपुत्र अनिल पाटील यांचा राजकीय उदय हा याच 32 गावांपैकी एक असलेल्या अमळगाव गटातून झालेला आहे. हे त्यांनी विसरू नये.त्यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील या सुद्धा याच वंचीत 32 गावांपैकी कळमसरे, मारवड गटाचे नेतृत्व करतात. या 32 गावातील शेतकर्‍यांच्या मुळावर जर अनिल पाटील उठत असतील तर ही गावे तुमचा राजकीय बाजार उठवल्या शिवाय राहणार नाहीत, हे तुम्ही आत्ताच कुठेतरी कोरून ठेवा म्हणजे लक्षात राहील.अशी अगदी टोकाची प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने संतापात दिली आहे.

ओल्या दुष्काळाचा सानुग्रह दोन वर्षांत मिळालेला नाही. तर यंदा पावसाचाच पत्ता नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. मात्र भूमिपुत्र सपत्नीक गावोगावी उद्घाटन, भूमिपूजन करत हिंडण्यात आणि प्रसिद्धी माध्यमातून आपले फोटो छापून आणण्ण्यात धन्यता मानत आहेत. कोरडा दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी मग ते तोंड कधी उघडणार, शब्द कधी खर्ची पाडणार, आणि शेतकऱ्यांना दिलासाा कधी मिळवून देणार असा प्रश्‍न अमळनेर मतदारसंघवासींच्या पुढे उभा ठाकला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button