Pandharpur

मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व पात्र मतदार बंधू-भगिनींना राष्ट्रीय मतदार दिन दिनांक 25 जानेवारी रोजी मतदान यादी मध्ये आपले नाव समाविष्ट करण्याबाबत तहसीलदार सुशील बेल्हकर यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व मतदार ना आवाहन केले आहे याबाबत बोलताना ते म्हणाले 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पात्र मतदारांनी मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट केलेली नाहीत 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार प्रशासनाने दिलेला आहे असे युवक युवती तसेच काही कारणाने नागरिकांची नावे समाविष्ट होऊ शकलेले नाहीत अशा लोकांनी पवित्र मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी तहसील कार्यालय मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करू शकतात यासाठी तहसील कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करणार आहे यासाठी तालुक्यातील 50 गावांमध्ये महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत तसेच गावागावात( बी एल ओ) अधिकारी यासाठी नेमलेले आहेत यामुळे सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे तरी दिनांक 25 जानेवारी रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button