Amalner

पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थे मार्फत  सत्कार!

पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थे मार्फत सत्कार!

अमळनेर : अमळनेर तालुक्याचे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी तर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. तर या आधी धरणगाव तालुक्यात देखील जयपाल हिरे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांच्या कामाची दखल घेत धरणगाव येथील प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तर कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चौधरी व इतर मान्यवर यांनी अमळनेर येथे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेक फ्रेम देवून (12 सप्टेंबर) अमळनेर पोलिस निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

सुनील भाऊ यांच्या कार्याची समाजाला दिशा

तर या सत्काराचे आयोजन सुनील चौधरी व इतर मान्यवर यांच्याकडून अमळनेर शहरातील मुंदडा नगर या भागात करण्यात आलं होतं. तर यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हिरे यांनीदेखील सुनील चौधरी यांच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्यात, मात्र यावेळी बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव देखील केला आहे. तर सुनील भाऊ चौधरी यांच्या कार्याची समाजाला नेहमी दिशा मिळत असते असा देखील उल्लेख करायला जयपाल हिरे विसरले नाही. तर या सत्काराच्या निमित्ताने दोघांनीही एकमेकांच्या कार्याचं कौतुक केल्याचा प्रत्यय आला.

तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी व इतर मान्यवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन, माजी नगरसेवक अनिल महाजन, सुनील महाजन, भैय्या महाजन, नाना महाजन, फारुख पिंजारी, भरत मिस्त्री, राहुल महाजन, अनिल चौधरी, सुनिल चौधरी, गोपनीय विभागाचे दिपक माळी हे देखील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button