Surgana

एक हाक. माणूसकीची.!.चला बनूया पोलिस मित्र…

एक हाक. माणूसकीची.!.चला बनूया पोलिस मित्र…

विजय कानडे

अनोळखी,अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला.
सुरगाणा तालुक्यात सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या मालगव्हाण शिवारातील अळीवपाडा गावाजवळ ता.10 डिसेंबर 2020 रोजी पहाटेच्या सुमारास रस्त्यालगत एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे.
मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृतदेहाचे वर्णन खालील प्रमाणे.
वय- अंदाजे 62ते 65 वर्ष.रंग- गोरा,उंची-अंदाजे पाच फूट सहा इंच, चेहरा-लांबट,गोल नाकाची ठेवण- सरळ. डोक्याचे केस- सफेद पिकलेले बारीक.
दाढी- वाढलेली,अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट, फिकट आकाशी रंगाची पँट,अंगात तपकिरी रंगाचे जर्कीन जॅकेट, पायात महाराजा राजस्थानी बुट, बहुतेक हिंदी भाषिक असावा असा अंदाज.वरील वर्णनाची व्यक्ति हरवलेली असेल अथवा घरातून निघून गेली असेल किंवा एखाद्या पोलिस स्टेशनच्या डायरीला हरवलेली नोंद करण्यात आली असेल तर खालील पत्त्यावर संपर्क करुन ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क –
पोलिस ठाणे सुरगाणा जि.नाशिक( महाराष्ट्र) पोलिस हवालदार श्री.एम.के. पवार मो- 7796051927.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button