Amalner

अमळनेर: दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या शासन मान्य असलेली पेंशन नियमीत व विनाअट घरकुल तसेच रेशनकार्ड द्यावे.. राष्ट्रीय विकलांग पार्टीची मागणी

अमळनेर: दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या शासन मान्य असलेली पेंशन नियमीत
व विनाअट घरकुल तसेच रेशनकार्ड द्यावे.. राष्ट्रीय विकलांग पार्टीची मागणी

अमळनेर दिव्यांग दिनी आपणास कळवितो इच्छितो की,अमळनेर तालुक्यातील विकलांग लोकांची आजची दैनंदीन परिस्थीती हालाकीची असून काही विकलांग लोकांकडे पैसे नसल्यामुळे ते आपले दैनंदिन गरजा भागवू शकत नाही. तसेच त्यांचे खाण्यापिण्याचे अंत्यत हाल अपेष्टा होत असून शासनाने दिव्यांग व्यक्तीना दिलेली दिव्यांग पेंशन मध्ये वाढ होऊन तो रु.रु.२०००/मात्र करण्यात येवून सदरची दिव्यांग पेंशनची रक्कम नियमीत मिळण्यात यावे जेणे करून दिव्यांग व्यक्ती हे त्यांचे दैनंदीन गरजा भागवू शकतील. तसेच दिव्यांग व्यक्तीना रेल्वेची सवलत देण्यात यावी.तसेच दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल व रेशनकार्ड मिळण्यात यावे. तसेच
दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने जे जी.आर.काढले असतात ते मात्र आजरोजी दिव्यांग व्यक्तींना लागू पडत नाही तरी ते लवकरात लवकर मिळण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय विकलांग पार्टीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.यावेळी महिला मोर्चा सविता रविंद्र सांळुखे,जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील,तालुकाध्यक्ष बिरजू छगन चौधरी,शहरउपाध्यक्ष करिम बागवान,तालुका सचिव राकेश संजय पाटील,अमळनेर शहर अध्यक्ष अमोल मधुकर पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button