Amalner

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..! 6 गुरे चोरीस..!

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..! 6 गुरे चोरीस..!

अमळनेर येथील झाडी शिरसाळे या गावातून दोन शेतकऱ्यांची 75 हजार किंमतीची 6 गुरे चोरीला गेल्याची घटना घडली असून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथील रविंद्र रामचंद्र पाटील यांची 2 गायी आणि एक वासरी ही गुरे 17 डिसेंबर रोजी कुणीतरी अजात चोरटयांनी चोरून नेली .आजूबाजूला शोध घेतला असता गुरे मिळाली नाहीत.
तर शिरसाळे येथील बाळू भीमसिंग पाटील यांच्या शेतातील दोन बैल व एक गाय बांधलेली होती.पण ती जागेवर आढळून आली नाही.आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळाली नाहीत. रवींद्र पाटील आणि बाळू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button