Nashik

देवळा : सावकीजवळ श्वानाला वाचवताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

देवळा : सावकीजवळ श्वानाला वाचवताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

महेश शिरोरे
सावकी ता.देवळा येथील रायगडवस्ती जवळ अचानक चालत्या गाडीच्या मध्ये आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. श्रावण पवार (४३, रा.मोकभणगी ता.कळवण) असे युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा युवक दुचाकीवरून (एमएच ४१ बीए ३५८३) मोकभणगी ता. कळवण ह्या आपल्या गावावरुन सावकी फाट्यामार्गे सटाण्याकडे जात असतांना सावकी जवळील रायगड वस्तीजवळ हा अपघात घडला. येथील रायगड वस्ती जवळ रस्त्यावर अचानक कुत्रा गाडीला आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे भरधाव असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरून अपघात झाला. या अपघातात युवकाला जबर मार लागल्याने हा युवक जागीच ठार झाला. या अपघाताची देवळा पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख व पोलीस सोनवणे ,पवार आदींसह करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button