Pandharpur

?️ Crime Dairy धक्कादायक..आपल्याच मुलीवर ठेवली वाईट ‘नजर

?️ Crime Dairy धक्कादायक..आपल्याच मुलीवठेवली वाईट ‘नजर

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : आपल्याच अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवणाऱ्या नराधम पित्याविरोधात मुलीच्या आईनेच आवाज उठवला त्यामुळे वासनांध पित्याचे बिंग फुटले आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉकलेटचे अमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्यात घडली होती. या घटनेचा अद्यापही निषेध होत असतानाच ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली असल्याने हादरा बसला आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार हा वासनांध नराधम मे २०१८ पासून आपल्याच मुलीकडे वाईट नजरेने पाहत होता. दमदाटी करीत या लहान मुलीचा विनयभंग करीत होता. असेच विकृत वर्तन करीत असल्याचे या मुलीच्या आईच्या लक्षात आले आणि या आईने थेट पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गाठले, त्यामुळे त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील एका गावातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. बाप लेकीच्या पवित्र नात्यालाच हा कलंक असून आईने धाडस केल्याने नराधमाच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. मुली आधारासाठी आश्वासक म्हणून माता पित्यांच्या कुशीत विसावते आणि जगात हीच सर्वाधिक सुरक्षित जागा असं मानते पण ही विश्वासाची जागाच सर्वात मोठा धोका देते असाच अनुभव देणारी ही घटना आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button