Nashik

मनमाड लासलगाव रोडवरील खूनाचा उलगडा बारा तासात संशयित आरोपी केला जेरबंद

मनमाड लासलगाव रोडवरील खूनाचा उलगडा बारा तासात संशयित आरोपी केला जेरबंद

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक =लासलगाव मनमाड रस्त्यावर बत्तीस वर्षे तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली होती संशयित आरोपी यास बारा तासात अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलीआहे चांदवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या शिंगवे शिवारात अनिल अहिरे यांचा खून करणारा आरोपी यास तात्काळ अटक करा अशी सूचना स्थानिक गुन्हे शाखा चांदवड पोलीस यांना दिली होती
पोलीस तपास करत असताना एका गुप्त सूत्राकडून माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली बातमी मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व चांदवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक समीर बारवकर यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले व चांदवड मनमाड रस्त्यावरील सीसीटीवी फुटेज तपासण्यात आले सीसीटीव्हीमध्ये असलेल्या संशयित व्यक्तीची माहिती घेऊन चांदवड तालुक्यातील गंगावे येथील आरोपी दत्तात्रय विश्वनाथ धुमाळे याची चौकशी केली असता तो गावातच असल्याची माहिती मिळाली व संशयित आरोपी दत्तात्रय विश्वनाथ धुमाळ यास तात्काळ अटक केली मयत अनिल आहीरे याची चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचा पोलिसांना संशय आल्यावर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दत्तात्रेय धुमाळ यांनी कबुली दिली आरोपीला पुढील तपास करिता यास पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली नात्याने मेव्हणा असलेला अनिल अहिरे ला दारू पाजली व तोही पेला दारू चढताच अनिल वर सपासप वार केले व आपल्या गावी निघून गेला जसे काही घडलेच नाही असे वावरत असताना पोलिसांनी त्याला गंगावे गावी अटक केली पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार चांदवड पोलीस निरीक्षक समीर बावरकर पुढील तपास करत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button