चिमूर,चंद्रपूर

जलसंवर्धन काळाची गरज— संजय वैद्य जलसंवर्धन व सर्प जनजागृती कार्यक्रम थाटात

जलसंवर्धन काळाची गरज— संजय वैद्य

जलसंवर्धन व सर्प जनजागृती कार्यक्रम थाटात

जांभुळघाट (चिमुर) ज्ञानेश्वर जुमनाके

जलसंवर्धन काळाची गरज आहे. प्रत्येकांनी पाण्याचा वापर जपुन करावा. जलसंवर्धन चळवळ तयार झाली पाहीजे. असे प्रतिपादन जल तज्ञ संजय वैद्य यांनी जांभुळघाट येथे पर्यावरण संवर्धन समीती चिमुर कडून आयोजित जलसंवर्धन तथा सर्प जनजागृती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

साप मानवाचा मित्र आहे. सापाला मारु नये. सापाबद्दल समज व गैर समज दुर करण्यात यावे. साप चावल्यास काय करावे? विषारी व बिन विषारी सापाबद्दल माहीती सर्प मित्र अमोद गौरकार, अनुप येरने, विशाल मोरे यांनी प्रत्याक्षिक करुन दाखविले.
कार्यक्रमाचे उद्घाटक जलतज्ज्ञ संजय वैद्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष पि. एस. आय रविंद्र नाईकवाड, प्रमुख पाहुणे जांभुळघाट चे सरपंच वैशाली कन्नाके, प्रा. बिजनकुमार शिल, प्रा. एस. के चौधरी, प्रकाश पोतराज, सिंचाई विभाग चे पाझारे आदी पाहुणे उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन समीती चिमुर कडून निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षिसे वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांचा हस्ते पार पडले.

प्रथम बक्षिस ५_७ वर्गगटात कु. नैना नामदेव निवटे द्वितीय बक्षिस सावन वसंता घोडाम, ८–१० वर्गगटात प्रथम बक्षिस अंकुश विनोद मसराम, द्वितीय बक्षिस कु.बुद्धप्रीया गौतम खोब्रागडे, वर्गगट ११__१५ वर्गगटात प्रथम बक्षिस राहुल महेशकर द्वितीय बक्षिस कु. स्नेहा नामदेव निवटे यांना मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मोनाली ठाकरे. प्रास्ताविक पर्यावरण संवर्धन समीती चिमुर अध्यक्ष कवडू लोहकरे, आभार विशाल इंदोरकर यांनी मानले.
यावेळी निखिल भालेराव,आशिष ईखारे, सुदर्शन बावने,सुशांत इंदोरकर, क्रिष्णा मसराम, समिर बंडे, पंकज बंडे, चंद्रशेखर रेवतकर, पिपलायन आष्टनकर, मंगेश वांढरे, जयेश नन्नावरे, हरिष पोईनकर, रुपेश घोडमोरे, विशाल बारस्कर, राहुल गहुकर, अमोल शिंदे, मोहन सातपैसे, राज सातपैसे उपस्थित होते.
शासकिय माध्यमिक आश्रमशाळा, मधुवन ज्युनिअर काँलेज, जि. प. उच्च प्रा. शाळा,डाँ रमेश कुमार गजबे कला वानिज्य महा. जांभुळघाट येथिल विद्यार्थी उपस्थित होते. बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button