Surgana

Surgana: शासकीय आश्रम शाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप

Surgana: शासकीय आश्रम शाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप.

दरवर्षी प्रमाणे यंदाही पडक्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागेल.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी याच्यासह ग्रामस्थांनी बांधकाम पाडले बंद.

शासकीय आश्रम शाळा पळसन ( ता.सुरगाणा ) येथे आदिवासी विकास विभागातर्फे चालवल्या जाणा-या शासकीय आश्रम शाळा पळसन येथे संगणक प्रयोग शाळेचे इमारतीचे वनबधु कल्याण योजने मार्फत लाखो ४९९८७७७.८३ रुपये नविन इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असुन या इमारतीतचे बांधकाम चालू आहे, हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.या इमारतीत वापरण्यात येणारी वाळु ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडरीत तसेच बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडगोट्याचा वापरत असल्याची तक्रार परिसरात नागरिकांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष चौधरी. याच्याकडे केली असता,गावित यानी पळसन येथे बांधकामावर भेट दिली असता तेथे त्याना अतिशय निकृष्ठ दर्जाचे बांधकाम आढळून आले त्यानी तात्काळ काम बंद पाडले,संबंधित बाधकामा वरिल वापरण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे, ह्या बांधकामात वापरली जाणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर वापरली जात आहे,या शासकीय आश्रम शाळेत.परिसरातील आदिवासी विद्यार्थी ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, म्हणून बांधकामावर परिसरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे,हे बांधकाम चालू असताना आदिवासी विकास विभागाचे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खात्याचे अधिकारी
तर एकदाही ढुंकूनही पाहिले नाही .अधिकारी आणि ठेकेदार याचे साटे लोटे झाले की काय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही ही पडक्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागेल कि काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे, या आदिवासी मुलाच्या जिवाशी खेळ खेळणार याला जबाबदार अधिकारी व ठेकेदार अशी परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे, संबधित इमारत बाधकामावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्यात यावे, तसेच निकृष्ट दर्जाचे काम बंद करून निकृष्ट बांधकाम करणार्‍या व्यक्तीवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी सुभाष चौधरी
याच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन जोपळे. हेमराज धूम सह परिसरातील नागरिकांनी केली आहे,

प्रतिक्रिया.

1)शासकीय आश्रम शाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम
सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू ( रेती) असुन तसेच बांधकामावर पाणी कमी प्रमाणात मारले जात आहे, नागरिकांनी माझ्या कडे तोंडी तक्रारी केल्या . त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य ता जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट दिली असता, त्यात तथ्य आढळून आल्याने विभागामार्फत व काॅलेटी कंटोल विभागामार्फत तपासनी करून अहवाल आल्या नंतर पुढील कारवाई ठेकेदारावर व अधिकारी याच्यावर करण्यात यावी.

सुभाष चौधरी.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष चौधरी.

फोटो, शासकीय आश्रम शाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे सुरू असुन बांधकाम बंद पाडताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी.हेमराज धूम, मोहन जोपळे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button