Amalner

Amalner: महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत देवगांव देवळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड..

महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत देवगांव देवळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड..

अमळनेर देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा सुबोध व प्रबोध परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित ऑक्टोबर 2021 मध्ये सुबोध व प्रबोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात इयत्ता नववी मधील सुबोध परीक्षेसाठी 21 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते तर इयत्ता दहावीतील 16 विद्यार्थी प्रबोध परीक्षेला प्रविष्ट झाले होते. नुकताच महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे यांनी ऑक्टोबर 2021 परीक्षेचा
निकाल जाहीर केला. इयत्ता नववी मधील सुबोध परीक्षेत विशेष योग्यता श्रेणीमध्ये हर्षला विनायक पाटील व संजना शिवाजी पाटील या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तर प्रथम श्रेणीत 13 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 4 विद्यार्थी व तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता दहावी मधील प्रमोद परीक्षेत प्रथम श्रेणीत 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणी 3 विद्यार्थी व तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेत एका कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात येणार आहे हिंदी अध्यापक आय .आर. महाजन यांनी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेल्या दहा वर्षापासून हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा घेतले जातात व शाळेला केंद्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे असे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील
यांनी सांगितले व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button