Nashik

निगडोळ चाचडगाव येथे तुफान गारपीट द्राक्षबागाचे मोठे नुकसान

निगडोळ चाचडगाव येथे तुफान गारपीट द्राक्षबागाचे मोठे नुकसान

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

दिंडोरी – तालुक्याच्या पश्चिम भागात काल सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व तुफान स्वरूपाची गारपीट झाल्यामुळे द्राक्षबागेचे 100% नुकसान झाले असून कादां, गहू,
इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वर्षातून एकदाच उत्पन्न देणारे पिक हातातून गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दिंडोरी तहसिलदार पंकज पवार ,उपसरपंच शरद मालसने कृषीसहाय्यक व ग्रामसेवक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनामे केले आहे.
काल सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वातावरण अचानक बदल घेऊन वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्यांमुळे निगडोळ, उमराळे खुर्द , चाचडगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे त्याप्रमाणे म्हेळुस्के, कादवा माळुगी, नळवाडी, निळवंडी, पाडे, मडकीजांब, जांबुटके, उमराळे बुद्रक, हातनोरे, वलखेड या परिसरातहि अवकाळी स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. तालुक्यातील निगडोंळ, चाचडगाव येथे मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस व गारपीट झाल्यांमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून काही द्राक्षबागा भूईसपाट झाल्या असून कादां, गहू,भाजीपाला आदी पिकांचे हि मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून फुलविलेल्या द्राक्षबागा काही क्षणात धुळीस मिळाल्या आहे त्यांमुळे नुकसानग्रस्त कुटूंबापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. निगडोंळ येथील द्राक्ष उत्पादक बबनराव मालसाने , योगेश मालसाने ,राजू मालसाने,दौलत मालसाने, भाऊसाहेब मालसाने, तुकाराम मालसाने, शिवाजी मालसाने, केशव मालसाने, निवृती मालसाने, दिपक मालसाने, तुकाराम मालसाने, अनिल मालसाने, चाचडगाव येथील रामचंद्र पेलमहाले आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

: सातत्याने पडणाऱ्या बेमोसमी पाऊस व हवामानामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे त्यातच द्राक्षाला भाव नाही निगडोळ परिसरात काल झालेल्या गारपीट मध्ये द्राक्षाचे,टोमॅटो कांदे भाजीपाल्याचे पूर्ण नुकसान झाले . सरसकट पंचनामे करून सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी.
शरद मालसाने
उपसरपंच निगडोळ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button