Dhule

आमदार फारूक शाह यांनी MIDC येथील स्वत:च्या जागेसह त्यांच्या निधीतून दिले ऑक्सिजन प्लांटसाठी ८० लक्ष रुपयांचा निधी

आमदार फारूक शाह यांनी MIDC येथील स्वत:च्या जागेसह त्यांच्या निधीतून दिले ऑक्सिजन प्लांटसाठी ८० लक्ष रुपयांचा निधी

असद खाटीक धुळे

धुळे : ऑक्सिजन प्लांटसाठी स्वत:ची जागा बिनामुल्य (मोफत) उपलब्ध करून देणार – आमदार फारूक शाह (धुळे दि. २३-०४-२०२१) धुळे शहरातील सद्यस्थितीत कोविड १९ चे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनचा प्रंचड तुडवडा जाणवत आहे. याचा संपूर्ण अभ्यास गेल्या अनेक दिवसांपासून आमदार फारूक शाह हे करत आहे. त्यांनी धुळेकर जनतेच्या सर्व समस्या पाहता त्यांच्या मालकीच्या असलेल्या MIDC मधील जागा क्रं. D – 43 ही १०, ००० दहा हजार स्केअर फुट जागा दोन वर्षांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणेकरिता बिनामुल्य अर्थात मोफत उपलब्ध करून दिली आहे. आमदार शाह हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधी २०२१-२०२२ मधून धुळे शहराकरीता मोफत उपलब्ध करून दिलेल्या जागेवर ऑक्सिजन प्लांट उभारणेकामी ८० लक्ष रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. सध्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी सुरु असलेली रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ आणि हाल अपेष्टा पाहता त्यांनी रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी देखील २० लक्ष रुपये निधी शासनाला उपलब्ध करून दिला आहे. वरील आशयांचे दोन्ही पत्र त्यांनी आज दि. २३-०४-२०२१ रोजी म. जिल्हाधिकारी संजय यादव साहेब यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या आधी देखील आमदार फारूक शाह यांनी दोन विद्युत दाहीनी केंद्र उभारणेकामी धुळे मनपाला ३० लक्ष रुपये निधी दिला होता. आमदार शाह यांनी कोरोना काळात केलेले काम धुळेकर जनता कायमस्वरूपी आठवणीत ठेवेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून आणि उपस्थितांकडून व्यक्त होत आहे.

कृपया प्रसिद्धीसाठी दि. २३-०४-२०२१

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button