Nandurbar

एस.टी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळणे बाबत निवेदन वेतन न मिळाल्यास आंदोलना चा इशारा..

एस.टी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळणे बाबत निवेदन वेतन न मिळाल्यास आंदोलना चा इशारा..

प्रतिनिधी : फहीम शेख

नंदुरबार : एस.टी.कामगारांना थकीत वेतन व देय होणारे वेतन मिळण्याबाबत.
आदरणीय महोदय,
कोरोनाच्या या आपत्ती काळात सोई सुविधांचा अभाव असतानाही एस.टी.कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून
अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतूकही एस.टी.कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत
करीत आहेत. एस.टी.महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत.
कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन
दिलेले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एस.टी.कर्मचा-यांना महागाई भत्ता व सण उवल देण्याचे कामगार करारान्वये मान्य
केलेले आहे. शासकीय कर्मचा-यांना माहे डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे.
परंतु एस.टी.कामगारांना सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव
२ टक्क्याची तीन महिन्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्याची नऊ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकीही
एस.टी.कामगारांना अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचा-यांना रू.१२,५००/- सण उचत लागू केलेली
आहे. परंतु एस.टी.कामगारांना अद्यापपर्यंत रू.१२,५००/- सण उचल लागू केलेली नाही.
दिवाळीसारखा महत्वाचा सण दि.१२ नोव्हेंबर २०२० पासून सुरु होत आहे. सदर सणापुर्वी एस.टी.कामगारांना
मागिल दोन महिन्यांचे थकीत वेतन, माहे ऑक्टोबर २०२० चे देय झालेले वेतन, महागाई भत्याची थकबाकी व शासकीय
कर्मचा-यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वास्तविक एस.टी.कर्मचा-यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय
तारखेस देण्याची जबाबदारी कायद्याने एस.टी.प्रशासनाची असतानाही प्रशासनाकडून एस.टी.कामगारांना नियत देय
तारखेस वेतन दिलेले नाही. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी
केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. दिवाळी सणापुर्वी दोन महिन्यांचे
थकीत वेतन, माहे ऑक्टोबर २०२० चे देय वेतन, महागाई भत्याची थकबाकी व शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सण उवल
मिळावी या मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व स्तरावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एस.टी.कामगारांना वेतन
मिळण्यासाठी दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी मा.जिल्हाधिकारी व मा.तहसिलदार यांना निवेदन देतील. यानंतरही
एस.टी.कामगारांना थकीत वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सण
.टी.कामगारांना न मिळाल्यास एस.टी.कर्मचारी ल्या राहत्या घरासमोर आपल्या कुटूंबियांसह दि.९ नोव्हेंबर
२०२० रोजी वेतन मिळावे या मागणीसाठी आक्रोश व्यक्त करतील.
आपणास विनंती करण्यात येते की, एस.टी.कामगारांना थकीत वेतन, देय झालेले वेतन व थकीत महागाई भत्ता
मिळावा यासाठी आपण शासकीय पातळीवरून प्रयत्न करावेत. म्हणजे एस.टी.कामगार व त्यांच्या कुटूंबियांची वेतनाविना
होणारी उपासमार थांबविण्यास मदत होईल ही नम्र विनंती.
उचलएसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत तीन महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, या मागणीचे निवेदन, एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना नंदुरबार आगाराच्या वतीने मा .खासदार हिना ताई गावित मा आमदार विजयकुमार गावित मा .जिल्हाधिकारी नंदुरबार, व मा.तहसीलदार सा.यांना देण्यात आले.
निवेदन देतांना कामगार संघटना चे पद अधिकारी आगार सचिव श्री जी.एस.ठाकरे, अध्यक्ष शरीफ मन्सुरी, कार्याध्यक्ष हिरामण पाटील, तसेच उपधक्ष जावीद शेख. व साजिद शेख उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button