Amalner

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ऍक्युपंक्चर तर्फे संपन्न झालेल्या पात्रता परीक्षेत अमळनेर येथील तीन डॉक्टरांचे नेत्रदीपक यश..

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ऍक्युपंक्चर तर्फे संपन्न झालेल्या पात्रता परीक्षेत अमळनेर येथील तीन डॉक्टरांचे नेत्रदीपक यश..

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्यूपंचर,मुंबई तर्फे दि.10/10/2021 रोजी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत अमळनेर तालुक्यातून डॉ.मुकेश बोरसे अमळनेर,डॉ.केशव नेमाडे अमळनेर,डॉ.प्रशांत पवार पिळोदे ता.अमळनेर या तिघांनी नेत्रदिपक यश मिळवीत तालुक्याचे नाव उंचावले आहे. राज्यभरातील सुमारे सात हजार ॲक्यूपंचर चिकित्सा व्यवसाय करणाऱ्या पदवीधारकांना या पात्रता परीक्षेमुळे कायदेशीर दर्जा मिळाला असून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कौन्सिल तर्फे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पात्रता परीक्षेत राज्यातील सहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
उत्तीर्ण झालेल्या डॉ.मुकेश बोरसे,डॉ.केशव नेमाडे,डॉ.प्रशांत पवार यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button