Rawer

खिर्डी खु येथील आठवडे बाजार परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृहाचे बांधकाम करण्यात यावे-सामाजिक कार्यकर्ते राजू कोचुरे यांची मागणी

खिर्डी खु येथील आठवडे बाजार परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृहाचे बांधकाम करण्यात यावे-सामाजिक कार्यकर्ते राजू कोचुरे यांची मागणी

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

रावेर तालुक्यातील खिर्डी या गावी बँक, सेतू सुविधा केंद्र,शाळा तसेच मोठी बाजार पेठ असल्याने आजूबाजूच्या खेडेगावातील महिला व पुरूष,शाळकरी मुली आबाल वृध्द नागरिक यांची नेहमीच वर्दळ राहत असल्याने विशेषतःआठवडे बाजार परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह नसल्याने मोठी गैरसोय होत असून महिलांचे फार हाल होत आहे.तसेच मंगळवार हा बाजारचा दिवस असून व्यापारी महिलांची सुध्दा स्वच्छता गृह नसल्याने दमछाक होते.अशी विदारक परीस्थिती असतानाही ग्राम पंचायत प्रशासनास जाग का येत नाही?तसेच सदरील ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृहाचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी ग्राम पंचायत प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते राजू मांगो कोचुरे यांनी निवेदना द्वारे केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button