Amalner

?अमळनेर मधील राजकारण वरून कीर्तन आतून तमाशा..!की विदेशी बाटलीत गावठी..! फुलात काटे की काट्यात फुल..!

?अमळनेर मधील राजकारण वरून कीर्तन आतून तमाशा..!की विदेशी बाटलीत गावठी..! फुलात काटे की काट्यात फुल..!

अमळनेर येथील बॅनर वर राजकीय सावळा गोंधळ..!

अमळनेर च्या आळी मिळी गुप चिळी च्या राजकारणात कमळ आणि घड्याळ एकाच बॅनर वर दिसत असल्याने अमळनेर मध्ये चर्चा रंगत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठिक ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लावलेल्या या बॅनर वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार,कृषिभूषण माजी आमदार भारतीय जनता पक्ष, अमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ज्यांनी त्यांच्या “नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे” भारतीय जनता पक्षात विकासाच्या नावाखाली प्रवेश केला आहे. असे फोटो असून बॅनर च्या खाली शुभेच्छा देणाऱ्या व्यक्ती चा फोटो आहे.असाच प्रकारचे एक बॅनर हे बस स्थानक भागात देखील लावण्यात आले होते. त्यावर सर्व नगरसेवकांचे फोटो आणि वरच्या बाजूला वरील तीन राजकीय व्यक्तीं चे फोटो होते.

आता यावरून अमळनेर शहरात चर्चेला उधाण आले आहे. नेमकं जनतेने काय समजावं.. कार्यकर्त्यांनी काय करावं..असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा असे भोंगळ राजकीय चित्र दिसून येत आहे. जरी राजकारण खूप वाईट असले तरी राजकीय तत्व,पक्ष निष्ठा, राजकीय नियम नावाची काही गोष्ट असते की नाही याची या तालुक्यात कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला तमा नाही हे स्पष्ट झाले आहे.

विकासाच्या नावाखाली चाललेल्या ह्या बेडूक उड्या संपुर्ण जनतेने अनुभवल्या आहेत.उड्या विकासासाठी नसून स्वार्थासाठी आहेत हे देखील जनता समजून आहे.पण कुठे तरी राजकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आतून तुम्ही काय तमाशे चालवले आहेत हे जनता पाहत आहे. पण कमीत कमी इतका पण निर्लज्ज पणा नसावा की बॅनर वर एकत्रित फोटो टाकून स्वतःचीच इज्जत घालवून जनतेच्या मतां शी खेळण्याचा हा प्रकार आहे. ज्या विश्वासाने जनता तुम्हाला निवडून देऊन प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची संधी देते त्याचा असा गैरवापर करून स्वतः च हुकूमशहा सारखे वागणे हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button