Rawer

रिपब्लीकन पार्टी चा मोठे वाघोदा ग्रामपंचायतीवर मोर्चा अतिक्रमित जागा नांवे लावण्याची मागणी

रिपब्लीकन पार्टी चा मोठे वाघोदा ग्रामपंचायतीवर मोर्चा
अतिक्रमित जागा नांवे लावण्याची मागणी

प्रतिनिधी रावेर / मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर वडिलोपार्जित अतिक्रमित जागा नावे करण्याची रहिवासींची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील आंबेडकर नगर संलग्न वस्तीस लागून असलेल्या अतिक्रमण जागेवर रहिवासी असलेल्या ग्रामस्थांना वडिलोपार्जित राहत असलेल्या जागा ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ ला नांवे करुन सदर जागेवर घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा व संबंधित रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तसेच ८ दिवसांपूर्वी याच वस्तीसह निंभोरा रस्त्यावरील घरांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने नाल्याला महापुर आला होता व पुरावे पाणी घरांमध्ये शिरून गोरगरीब कष्टकरी कामगार मजूर रहिवासींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या पुस्तकात भागाची पाहणी करत नुकसान भरपाई चे तात्काळ पंचनामे सुध्दा करविले आहेत .अशा अनेक विविध मागण्यांसाठी यासाठी हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर काढण्यात आला होता.
या आधी या रहीवाशांनी राजु सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परीषदवर मोर्चा काढला होता.त्या अनुषगांनी सी ओ साहेबांनी यांना पत्र दिले होते की यांचे अतिक्रमण रेगुलाईज करण्यात यावे आणी बीडीओ ने या ग्रामपंचायतीला पत्र दिले होते पण यांनी त्या पत्राला काहीही उत्तर दिले नाही व त्यावर काहीही उपाययोजना केली नाही असे सुर्यवंशी यांनी सांगितले म्हणुन या संतप्त रहीवाशांनी आज हा मोर्चा काढला
तसेच काही दिवसांपुर्वी नाल्याला पुर आला होता नालेकाठ रहाणार्या रहीलाशांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे झाले आहेत पण गरीब मोलमजुरी करणार्या लोकांना लवकर मोबदला मिळाला अशीही मागणी त्यावेळी करण्यात आली.यासंबधी आम्ही जिल्हाधिकारी यांना सुद्धा शिष्टमंडळासह भेटणार आहोत असे ही राजु सुर्यवंशी यांनी सांगितले.
येत्या 15 आगष्ट रोजी ग्रामसभेत ठराव जर पास नाही झाला तर 16 तारखेला तीव्र आंदोलन छेडले जाईल व असा इशारा ही यावेळी देण्यात आला रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी रावेर तालुध्कायक्ष विवेक तायडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायत ने लेखी पत्र दिले यावेळी सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि जालींदर पळे यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button