Usmanabad

?म्हणून एकाचे प्राण वाचले..!

? म्हणून एकाचे प्राण वाचले…!
उस्मानाबाद : कोरोनासारख्या महामारीच्या काळात रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. कळंबमधील एका रुग्णास तातडीन बार्शीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होती, पण चालकाचा संपर्क होत नव्हता. यावेळी ऑक्सिजन ग्रुपने सामाजिक कार्यकर्ते, अमर चाऊस यांना आवाज दिला अन् अवघ्या क्षणार्धात हाकेला धाऊन आले.
स्वतः रुग्णवाहिका चालवत या तरुणाने गंभीर रुग्णास बार्शीत सुखरूप पोहचवत रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री आठच्या सुमारास कळंब येथील ऑक्सिजन ग्रुपच्या हर्षदः अंबुरे यांना एका कोविड सेंटरमधून गंभीर रुग्ण बार्शीला हलवण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी विनंती करण्यात आली होती .
यावेळी ग्रुपची एक रुग्णवाहिका शहरात होती, मात्र तिच्या चालकाच बराच प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. यावेळी कधी ही कॉल करा स्वतः असे कायम ‘ स्टेटस ‘ ठेवत असलेले सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांना रुग्णालयात हर्षद अंबुरे यांनी फोन करून संपर्क साधला .
त्यावेळी अमर चाऊस यांनी वेळ आणि काळाची गरज ओळखून तत्काळ होकार दिला. यानंतर अंबुरे यांच्यासमवेत चाऊस यांनी रुग्णवाहिका गाठली. रुग्णांना घेऊन त्यांना बार्शी येथे दाखल केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button