MaharashtraShirdi

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था

शिर्डी – राहुल फुंदे

शिर्डीच्‍या वतीने कर्नाटक राज्‍यातुन राजस्‍थानकडे जाणा-या सुमारे २५०० व्‍यक्‍तींना आज दिनांक २९ मार्च रोजी सायं.६.०० वाजता शिर्डी पोलिस स्‍टेशन नजिक अन्‍न पाकिटांचे वाटप करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री.डोंगरे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून अनेक ठिकाणाहुन कामाकरीता बाहेरगावी गेलेले व्‍यक्‍ती पुन्‍हा आपल्‍या मुळ गावी स्‍थलांतर करत आहे. अशातच ६६ बसेसव्‍दारे कर्नाटक राज्‍यातुन सुमारे २५०० व्‍यक्‍ती राजस्‍थानकडे निघालेले आहेत. हे सर्व शिर्डी येथे आले असता संस्‍थानच्‍या वतीने या सर्वांना अन्‍न पाकिटांचे वाटप करण्‍यात आले असून या अन्‍न पाकिटात चपाती, भाजी व मसालाभाताचा समावेश आहे. यावेळी संस्‍थान व पोलिस प्रशासनाच्‍या वतीने विशेष दक्षता घेवुन सुरक्षितपणे सर्व प्रवाश्‍यांना अन्‍न पाकिटांचे वाटप करण्‍यात आले.

श्री साईबाबांनी स्वताः भिक्षा मागुन गोरगरिबांना जेवण देत असे. तसेच बाबा नेहमी भुकेलेल्यांना अन्नदान करणेस सांगत. श्री साईबाबांच्‍या याच शिकवणुकीनुसार संस्‍थानचे श्री साईप्रसादालयाच्‍या वतीने दिनांक १८ मार्च २०२० पासुन दररोज सुमारे १८०० ते २००० व्‍यक्‍तींकरीता जेवण तयार करण्‍यात येत असून श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्‍दाआश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना दोन्ही वेळचे भोजन सुरक्षित अंतर ठेवून निःशुल्‍क पुरविण्‍यात येत असून जेवणामध्ये एक भाजी, डाळ, भात, चपातीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोपरगांव परिसरातील मतिमंद, बेवारस, अनाथ, दवाखान्यातील रुग्ण व त्‍यांचे नातेवाईक, वृध्‍द यांना दररोज अंदाजे ५००० ते ७००० अन्न पाकिटे पुरविण्‍यात येत आहेत, असे ही श्री डोंगरे यांनी सांगितले.

यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उप विभागीय पोलिस उप‍अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, श्री साईप्रसादालयाचे विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व पोलिस आणि संस्‍थान कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button