Dondaicha

शिंदखेडा तालुक्यात ११ ग्रामपंचायतीवर शिवसेनेची जोरदार मुसंडी शिरपूर मध्ये तीन ग्रामपंचायतीवर एन्ट्री….

शिंदखेडा तालुक्यात ११ ग्रामपंचायतीवर शिवसेनेची जोरदार मुसंडी शिरपूर मध्ये तीन ग्रामपंचायतीवर एन्ट्री….

असद खाटीक दोंडाईचा

दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यात पार पडलेल्या ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने एकूण अकरा ग्रामपंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत तालुक्यात एकूण पंधरा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपची अनेक ठिकाणची सत्ता उलथवून लावली आहे.तर शिरपूर तालुक्यातही तीन ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

शिंदखेडा तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये शिवसेनेने ११ ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवत तर शिरपूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत विजय संपादन केला आहे. शिंदखेडा तालुक्यातही महा विकास आघाडीच्या माध्यमातून पंधरा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.
शिंदखेडा तालुक्यात सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून भाजपचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये यंदा शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. अनेक ठिकाणी भाजपची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने ग्रामपंचायती काबीज केले आहेत. यामध्ये पडावद ,डाबली, देवी, महाळपुर ,दसवेल, जातोडा, अक्कडसे, खलाणे, डांगुर्णे, धावडे या ग्रामपंचायती तर शिरपूर तालुक्यातील चाकडू, टेकवाडे, हिंगणी पाडा या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिंदखेडा तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चौगाव, बेटावद, दलवांडे, प्र न दरखेडा, दसवेल, सतमाने, जखाणे, हंबर्डे, जसाने, लोहगाव, मुडावद, वरूळ, घुसरे, विरदेल या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी माध्यमातून शिवसेनेने तालुक्यात एन्ट्री केली आहे. सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात ,राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नाअब्दुल सत्तार, शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ सोनवणे ,शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख हेमंतराव साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शिरपूरचे उपजिल्हाप्रमुख भरतसिह राजपूत, तालुकाप्रमुख गिरीश देसले, शिरपूर तालुका प्रमुख अत्तर सिंग पावरा, दिपक चोरमले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button