दिंडोरी शहर विकास विविध योजना राबविणे साठी शिवसेना तालुका प्रमुख यांनी घेतली नगरविकास मंत्री शिंदे यां ची भेट
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी शहरातीलविविध प्रलंबित विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन शिवसेनेचे नगर विकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज च्या बैठकीत दिले , धामण नदी संवर्धन प्रकल्प , दिंडोरी शहरातील क्रीडा संकुल, नगरपंचायत ची प्रशासकीय इमारत बांधकाम ,शहर परिसरातील शिवार रस्ते, धामण नदी वरील मारुती मंदिराजवळील पूल, नगरपंचायतचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी समावेशन व त्यांना किमान वेतन श्रेणी लागू करणे,गांधीनगर,जाधव वस्ती विकास प्रकल्प ही कामे नगरविकास खात्यातर्फे करण्याचे आश्वासन नामदार शिंदे यांनी दिले, यासह दिंडोरी शहरातील विविध प्रश्नांवर शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, युवासेना विस्तारक निलेश गवळी,नगरसेवक सचिन देशमुखयुवानेते रणजित देशमुख पत्रकार नितीन गांगुर्डे यांनी मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली