Amalner

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील कोरोना योद्धयांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील कोरोना योद्धयांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान…

नूरखान

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जे कर्मचारी शासकीय अधिकारी, पत्रकार,पोलीस अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, नगरपालिका कर्मचारी ग्रामीण रुग्णालयातिल आरोग्य सेवक, प्रताप कोविड सेंटर मधील डॉक्टर, सर्व कर्मचारी शहरातील विविध भागात आपली सेवा देत असलेले पोलीस बांधव जे शहरात कोरोनाच्या कालखंडात आपली घरदार सोडून सेवा देत आहेत त्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करून आम्ही आभार मानले.

अभाविप च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पर्यंत जाऊन त्यांच स्वागत केलं म्हणून त्यांचा उत्साह वाढला अश्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,पो ना शरद पाटील, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे,प्रा जितेंद्र पाटील,राजेंद्र पोतदार,महेंद्र पाटील,सामाजिक कार्यकर्ते भरत पवार,कोव्हीड केअर सेंटर येथील डॉ प्रकाश ताडे,अधिपरिचारीका,परिचारिका,पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी,कोव्हीड केअर सेंटर मधील सुरक्षा कर्मचारी, पो ना योगेश महाजन,पत्रकार आणि अपंग क्रांती प्रहार चे शहराध्यक्ष योगेश पवार इ ना सन्मानित करण्यात आले.

यावेळी अभाविप अमळनेर शहरमंत्री निलेश पवार , सहमंत्री प्रितेश पाटील, विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, वैभव पाटील, केशव पाटील, पवन सातपुते, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button