Ahamdanagar

“अहिल्यानगर” नामांतरास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशिर्वाद!

“अहिल्यानगर” नामांतरास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशिर्वाद!

(सुनिल नजन/अहमदनगर)
भारताचे पद्मभुषण सुपुत्र आणि महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे “अहिल्यानगर”हे नामांतर करावे या मागणीस पाठिंबा दर्शवून आशिर्वाद दिले. अहिल्यानगर नामांतर समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक विजय तमनर,अहमदनगर जिल्हा क्राईम रिपोर्टर पत्रकार सुनिल नजन,कोल्हापूरचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नारायण खलू मोठे देसाई, ह.भ.प. दिलिप महाराज चव्हाण, संतोष गुंजाळ, देवेंद्र लंभाते,संजय वडितके,वैभवशेठ तमनर,बाळासाहेब विटनोर,पोपट बाचकर,अरुण मतकर, यांनी राळेगणसिद्धी येथे जाउन तेथील यादवबाबा मंदिरात जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हा नामांतर समन्वय समितीच्या समन्वयकांना आशिर्वाद देताना अण्णा हजारे म्हणाले की तुम्ही हे प्रकरण सरकार दरबारी वरपर्यंत जाउद्या मी मुख्यमंत्र्यी, उपमुख्यमंत्री यांच्याशी नामांतराबाबत बोलतो असे सांगून जिल्हा नामांतर क्रुती समितीस आशिर्वाद दिले. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवीचे जन्मगाव तीर्थक्षेत्र चौंडी येथे जाउन अहिल्यादेवीच्या स्मारकातील महादेव मंदिरात नतमस्तक होत नामांतर समन्वय समितीच्या वतीने महादेवाची विधीवत पुजा करून हरहर महादेवाच्या गजरात “अहिल्यानगर” नामांतराची शफत घेतली. आणि अहिल्यादेवीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अहिल्यानगर नामांतर लढ्याचे रणशिंग फुंकले. रथयात्रेचे स्वागत करताना प्रथम कर्जत-जामखेड चे आमदार रोहीत पवार,अक्षय शिंदे, यांनीपाठिंबा दिला,कर्जत मध्ये भाजप, वंचित, मनसे,आणि नगरपालिकेच्या वतीने नामांतरास पाठिंबा देण्यात आला. श्रीगोंदा येथे माजी मंत्री आणि चौंडी विकास प्रकल्पाचे प्रणेते माजीमंत्री अण्णासाहेब डांगे,जेष्ठ नेते, घनश्याम शेलार, विठ्ठलराव वाडगे,पारनेर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष विजूभाउ औटी, नगरसेवक पै.पठारे,ढवळपूरीचे लोकनियुक्त सरपंच भागाजी गावडे,चेरमन, सुखदेव चितळकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे, बंडुशेट रोहोकले,सुप्याचे उपसरपंच दत्ता पवार, जिल्हा परिषद सदस्य राहुल शिंदे,युवानेते कैलास नर्हे,यांनी जोरदार स्वागत केले. शेवटी पारनेरचेआमदार निलेश लंके यांनी नामांतर समितीची प्रत्यक्ष भेट घेउन आपला पाठिंबा जाहीर केला. आणि येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगर नामांतराचा आवाज उठवून थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button