Amalner

अमळनेर: बापानेच केला मुलावर विळ्याने वार…अमळनेरात साने नगर मधील घटना…!

अमळनेर बापानेच केला मुलावर विळ्याने वार…अमळनेरात साने नगर मधील घटना…!

अमळनेर खोटी माहिती दिली असे सांगितल्याने चिडून जाऊन बापाने मुलाच्या पाठीवर विळ्याने वार केल्याची धक्कादायक घटना दि १४ नोव्हेंबर रोजी
अमळनेर ब शहरातील सानेनगर भागात घडली आहे.यामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील सानेनगर भागातील रहिवासी प्रकाश राघो पाटील त्यांच्या भावाला शिवाजी पाटील ला फोन करून आई आजारी आहे, तू लवकर ये असेव फोनवर सांगितले. परंतु शिवाजी पाटीलने खात्री करून घेण्याच्या उद्देशाने पुतण्या रोहित प्रकाश पाटीलकडे विचारपूस केली.मुलाने वडील खोटे बोलले असे सांगत आजीची तब्येत चांगली असून काकांचे आजीशी बोलणे करून दिले. वडिलांचे खोटे बोललेले उघडकीस आल्याचा राग येऊन त्यांनी रोहित पाणी भरत असताना अचानक त्याच्या पाठीवर विळ्याने वार केला.पण तो त्याच्या कानाजवळ लागला आणि तो खाली पडत असताना पुन्हा मारण्यासाठी धावले.पण आई बहीण मध्ये पडल्या आणि त्यांनी प्रकाशला आवरले आणि रोहितला धुळे येथे खाजगी दवाखान्यात नेले.रोहितने दवाखान्यातुन जबाब दिला त्यामुळे वडील प्रकाश राघो पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय रामकृष्ण कुमावत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button