Chimur

गावचा सरपंच झाला अदृश्य.. गावकरी वाऱ्यावर..महादवाडी गावाचा कारभार चालतो नागपुर वरुण

गावचा सरपंच झाला अदृश्य.. गावकरी वाऱ्यावर..महादवाडी गावाचा कारभार चालतो नागपुर वरुण

चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील प्रकार

प्रतिनिधी चिमूर डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके ।
चिमूर,,
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या महादवाडी येथील गट ग्राम पंचायत चे सरपंच हे सरपंचपदी आरूढ झाल्यापासून मागील अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत च्या कार्यालयात तसेच गावात दिसत नसल्यामुळे महादवाडी गावकऱ्यांना आमचे सरपंच अदृश्य झाले आणि गावकरी वाऱ्यावर असे म्हणण्याची पाळी आली आहे
सविस्तर असे की महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी हे नागपूर इथे वास्तव्याला आहेत तिथूनच ते जास्तीतजास्त कारभार करतात असे गावकऱ्यांनी सांगितले असून वेळोवेळी आलेल्या कामांना सरपंच साहेबाच्या अनुउपस्थिती मुळे नागरिकांचे कामे होत नाही कारण तात्काळ पाहिजे असणारे ग्रामपंचायत चे दाखले प्रमाणपत्र शासकीय कागदपत्रे यावर सरपंच साहेबांची सही पाहिजे परंतु नेहमीच गैहजर राहिल्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल सरपंच याना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला तर उद्या येतो परवा येईन अशी उडवा उडवीचे उत्तर मिळतात असे गावकऱ्यांनी सांगितले आहे तसेच काही सभा हे हजर न राहता व्हिडीओ कन्फरसने ने नागपूर वरून घेतात व सरपंच हे स्वतःच्या मर्जीने कारभार करतात असा आरोप गावकऱ्यानी केला आहे
ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी असलेल्या सिद्धार्थ रामटेके मागील 26 वर्षापासून सेवा देत होते परंतु सरपंचांसोबत त्यांचा वयक्तिक वाद होता त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देऊन कामावरून काढून टाकले याबाबत सवर्गविकास अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांना पुन्हा कामावर घेतले परंतु 2 महिन्यात सरपंचांनी पुन्हा काढले आणि आपली मनमानी केली तसेच त्यांचे 2017 पासूनचे थकीत वेतन देण्यास टाळाटाळ केली गावातील कर न भरणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांची नावे वॉट्सअप वरून सोसियल माडिया च्या माध्यमातून प्रसिध्द केले स्वतःच्या मताने मासिक सभेचे आयोजन सरपंच करतात आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या cctv कॅमेरे लावून स्वच्या मोबाईल ला जोडून कोण येतो कोन जातो यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांचे सुद्धा व्हिडीओ व्हायरल करतात त्यामुळे नागरिकांना त्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे स्वतःच्या मतांनी निर्णय घेणे मासिक सभेचे आयोजन करणे असे अनेक निर्णय मनमर्जी ने घेऊन नागरिकांना नाहक त्रास देत असल्याने गावकरी हवादील झाले आहेत गावात हजर न राहता जास्तीत जास्त बाहेर गावी राहून ग्रामपंचायत चा कारभार चालवतात त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही तेव्हा या अदृश्य सरपंचावर कारवाई करून त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी गावकरी वर्ग यांनी केली आहे तेव्हा संबंधित विभागाने यावर लक्ष देऊन गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button