Pandharpur

दि.शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीच्या बोधचिन्हावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप !

दि.शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीच्या बोधचिन्हावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप !
छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन करणार्‍या रामदास स्वामींची प्रतिमा हटवण्याची मागणी.

रफिक आतार

पंढरपूर :- दि.शिवसमर्थ मल्टीस्टेट को – आॅप क्रेडिड सोसायटी लिमिटेड,तळमावळे,शाखा पंढरपूर या संस्थेच्या,छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणार्‍या रामदास स्वामींच्या बोधचिन्हावर संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर शाखेने आक्षेप घेतलेला असून,सदर बोधचिन्ह हटवण्याची मागणी संस्थेला निवेदनाद्वारे केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांना गुरु शिष्य दाखवणे हे अनऐतिहासिक असून,यातून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विकृतिकरण करण्यात आलेले आहे.रामदास स्वामी हे अदिलशहा आणि मोगलांचे हेर होते हे मा.म.देशमुख विरुद्ध महाराष्ट्र शासन खटल्यामध्ये सिद्ध झालेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची मुळात कधी भेटच झाली नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि रामदास स्वामी यांना एकत्रित दाखवणे अनऐतिहासिक व इतिहासाचे विकृतीकरण करणारे आहे.

त्यामुळे सदर संस्थेने त्यांच्या बोधचिन्हामध्ये येत्या दहा दिवसात बदल करावा.अन्यथा संस्थेविरोधात कायदेशीर करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आलेला आहे.याप्रसंगी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष लखनराज थिटे,शहर उपाध्यक्ष शनि घुले,शहर सचिव प्रज्वल नागटिळक,शहर संघटक राकेश साळुंखे,रोहित फावडे,जयदिप माने,अदित्य तारे,प्रणव गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button