Amalner

कोंडावळ गावातील जलरागिनी मीना पाटील व उर्मिला पाटील यांच्या जिद्दी कार्यास सलाम

कोंडावळ गावातील जलरागिनी मीना पाटील व उर्मिला पाटील यांच्या जिद्दी कार्यास सलाम

कोंडावळ गावातील उमेद अभियाना च्या सी आर पी मिना पाटील व बचत गटाच्या सचिव उर्मिला पाटील यांनी केले गावातील माथा, मध्य आणि पायथा या तीनही विभागातील शेत शिवारातील पाणलोटाचे नेतृत्व करणार्‍या ११ विहिरीच्या पाणी पातळीचे मोजमाप पूर्ण करून पूरूषाना लाजवेल असे केले या दोन्ही महिलांनी काम पाणी फाउंडेशन च्या समृद्ध गाव स्पर्धेचे काम अमळनेर तालुक्यातील कोंडावळ गावामध्ये गेली दोन वर्ष झाले सातत्याने सुरू आहे पण गावातील काही महिलांना पाणी फाउंडेशन च्या समृद्ध गाव स्पर्धेत आपण काम करून आपल गाव समृद्ध बनवण्याची खूप इच्छा होती पण गावातील युवक व पुरुष हे कोणीच या महिलांना साथ देत नव्हते पाठी मागील वर्षी महिलांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले पण त्यांना कामे करण्यासाठी गावातिल कोणीच साथ दिली नाही उलट त्यां महिलांनी असे काम करून कुठे गाव समृद्ध होते का असे लोक म्हणत होते पण पण या महिला सातत्याने पाणी फाउंडेशन टीमच्या संपर्कात राहत असलेमूळे अनेक गावामध्ये चाललेली वेगवेळी समृद्धगाव स्पर्धेची कामे पाहून आमची काहीतरी कोंडावळ गावामध्ये काहीना काहीतरी काम करण्याची जिद्द आहे पण आम्हाला कोणी साथच देत नाही आम्ही काय करायचे असे या महिलांना सारखे वाटत असे अशातच पाणी फाऊंडेशनचे ‘समृद्ध गाव स्पर्धेच्या’ ‘मिनी स्पर्धा दोन’ चे एकदिवसीय प्रशिक्षण अमळनेर या ठिकाणी पार पडले आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मीना पाटील व उर्मिला पाटील प्रशिक्षणार्थ्यांनी गावाला ‘समृद्ध’ बनवण्याचे ज्ञान घेतले व आपल्या सोबत कोणी ‘येवो अथवा न येवो’ आपल्याला हे काम करावयाचे आहे हा निश्चय करून या घेतलेल्या ज्ञानातून या मीना पाटील व उर्मिला पाटील यांनी प्रेरणा घेऊन कोंढावळ गावातील ११ विहिरींच्या पाणी पातळी चे मोजमाप केले व महिला काय करू शकतात! हे दाखवून दिले व दोघी दोघी महिला मिळून पुढे ही ‘समृद्ध गाव स्पर्धे’च्या वेगवेगळ्या कामामध्ये सर्व घटकांवर ती जोमाने काम करू असा या ध्येयवेड्या या महिलांनी निर्धार केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button