Chandwad

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तरुणांना संधी मिळावी-सचिन अग्रवाल यांनी शिवसेनेकडे मागणी

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तरुणांना संधी मिळावी-सचिन अग्रवाल यांनी शिवसेनेकडे मागणी

उदय वायकोळे चांदवड

चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.इच्छुक उमेदवार वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.5 वर्षांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची युती होती त्यावेळी भाजपचे सभापती व शिवसेनेचे उपसभापती असे गणित जमले होते,मात्र महाराष्ट्र राज्यात 2019 पासून महाविकास आघाडीत तीन पक्ष शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व आय काँग्रेस यांची आघाडी झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था व मार्केट कमिटी यामध्ये काय फॉर्म्युला ठरतो हे लवकरच समजेल.याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा व्यापारी श्री सचिन अग्रवाल यांनी नाशिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री नितीनदादा आहेर यांच्याकडे तरुणांना शिवसेनेकडून संधी द्यावी अशी मागणी केली असल्याचे श्री सचिन अग्रवाल यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button