Chandwad

चांदवड शहरात धुराळणीला सुरुवात

चांदवड शहरात धुराळणीला सुरुवात

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहर सध्या अनेक समस्यांनी ग्रासलेले होते यातच नवीन मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके साहेब रुजू झाल्यापासून ते स्वतः शहरात स्वच्छता,इतर कामकाज,गटारी रस्ते यांची पाहणी करताना दिसून येत आहेत.कालपासून शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक फवारणीची मागणी होत असल्याने महालक्ष्मी नगर परिसरात स्वतः मुख्याधिकारी साहेब हजर राहिले व कर्मचाऱ्यांना धुरळणी बाबत सूचना केल्यात,यावेळी मच्छिंद्र जाधव,यशवंत बनकर,सुनील गायकवाड,व इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.रहिवाश्यांची कचरा घंटागाडीतच टाकला पाहिजे जेणेकरून दुर्गंधी पसरणार नाही असेही नगरपरिषद कर्मचारी सांगत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button