Mumbai

धरती माता क्रीडा मंडळाचा दीपोत्सव पारंपरिक रित्या संपन्न …!

धरती माता क्रीडा मंडळाचा दीपोत्सव पारंपरिक रित्या संपन्न …!

महेश्वर तेटांबे

दादर , प्रभादेवी येथील धरतीमाता क्रिडा मंडळाचा यंदाही पारंपरिक दिपोत्सव २०१९ विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महपूजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुर वीरांच्या जीवनावर आधारित “वीर मराठा” हा ऐतिहासीक सामाजिक प्रबोधनाचा देखावा, लहानमुलांचे धार्मिक व सांस्कृतिक लोककला नृत्य कार्यक्रम, आनंद मेळावा, शैक्षणिक प्रबोधनाच्या विविध स्पर्धा आणि साहित्य वाटप असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. विभागातील विविध मान्यवर आणि सामाजिक संस्थांनी ह्या उपक्रमास उपस्थित राहून मंडळास पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देवून कौतुक केले.
मंडळ कार्यकारिणी सदस्य विजेंद्र डांगे, समीर पाटील, शुभम वाडेकर, सिद्धेश मालप, महेश बोंबले, आराध्य आपकरे आणि प्रणित डांगे यांनी सर्व मान्यवरांचे “स्मृती चिन्ह” आणि “महाराष्ट्र पर्यटन” ही पुस्तिका देवून आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button