World

Russia Ukraine War: अडकलेले भारतीय परत आणण्याचे प्रयत्न..!240 भारतीय परत तर दोन उड्डाणे रद्द..

Russia Ukraine War: अडकलेले भारतीय परत आणण्याचे प्रयत्न..!240 भारतीय परत तर दोन उड्डाणे रद्द..युक्रेनमध्ये सध्या 20 हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश मेडिकलचे म्हणजेच वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. तर आयटी, फार्मा आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या सुरक्षिततेची सगळ्यांत जास्त चिंता भारताला आहे. जर रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर त्या युद्धाच्या परिस्थितीत तिथे असलेले भारतीय नागरिकही अडकतील. त्यामुळेच युक्रेनमधून शक्य तितक्या लवकर परतण्याची ॲडव्हायजरी भारत सरकारच्या वतीनं प्रसिध्द करण्यात आली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून ज्या भारतीय कुटुंबांची मुले-मुली तिथे अडकली आहेत, ती घाबरली आहेत. युक्रेनमध्ये अजूनही १८,००० हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली.एअर इंडियाच्या AI1947 या विमानाने मंगळवारी पहिल्यांदाच नवी दिल्ली ते कीवसाठी उड्डाण केले. २४० हून अधिक भारतीयांना धोकादायक परिस्थितीत घरी आणण्यात आले. 256-सीटचे बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान गेले होते. या आठवड्यात आज गुरुवार आणि शनिवारी आणखी दोन उड्डाणे केली जाणार होती. पण आता हल्ला सुरू झाली नंतर ती थांबवली आहेत.सध्या अडकलेल्या भारतीयांना बंकरमध्ये नेण्यात आले आहे.अनेक मुले युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता विमान येणार की नाही? याबाबत कुटुंबीय धास्तावले आहेत. येत्या काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. युद्धविराम दरम्यान विदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचा पर्याय देखील आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय दबावाखाली काही काळ हल्ला थांबवला तर भारतासह जगभरातील देश निर्धारित कालावधीत आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष उड्डाणे चालवू शकतात. असं असलं तरी आपण नागरिकांना लक्ष्य करत नसल्याचा दावा रशियाने केला आहे.

Russia Ukraine War: अडकलेले भारतीय परत आणण्याचे प्रयत्न..!240 भारतीय परत तर दोन उड्डाणे रद्द..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button