Pandharpur

नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी -अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढू

नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी -अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढू

नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी

प्रतिनिधी रफीक आत्तार

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्दवस्थ झाली आहेत. अशा संकट काळात राज्य शासनाने शेतकर्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करुन ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. या संदर्भात श्री.धोत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे.आधीच दुष्काळ, कोरोना या आपत्तीमुळे शेतकरी कर्जात बुडलेला असतानाच पुन्हा नैसर्गिक आपत्तीमुळे तो पूर्णपणे खचला आहे. शेतकर्यांना पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्व निधीतून शेतकर्यांना तातडीची प्रती हेक्टर आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकर्यांच्या शेतींपंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बील माफ करावे, शेतकर्यांना पु्न्हा लागवडीसाठी बि बियाणे आणि खतांचे वाटप करावे असेही निवेदनात नमूद केले आहे मागील चार ते पाच दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मंडळींचे पाहणी दौरे सुरु आहेत. त्यांच्या पाहणी दौर्यातून शेतकर्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी आता वाट न पाहता मदत जाहीर करावी.ग्रामीण आणि शहरी भागात मायक्रो फायनान्स आणि बचत गटाकडून घेतलेले कर्ज देखील शासनाने माफ करावे असेही यावेळी श्री.धोत्रे यांनी मागणी केली. सोमवारी (ता.19) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही धोत्रे यांनी लेखी निवेदन शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.राज्य शासनाने तातडीने शेतकर्यांच्या खात्यांवर मदत जमा करावी अन्यथा राज्य भरातील प्रत्येक तहसील कार्यालयावर मनसेच्या वतीने शेतकर्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला आहे.
यावेळी , मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, नगरसेवक अंबादास धोत्रे, महेश पवार,नागेश इंगोले,अमोल पुजारी, प्रथमेश पवार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button