Nashik

राष्ट्र समाज व संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह संकेत जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्र समाज व संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांची
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह संकेत जोशी यांचे प्रतिपादन

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : समाजाच्या जडणघडणीमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, ज्याप्रमाणे बहीण भावास राखी बांधते आणि भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन देतो, त्याचप्रमाणे राष्ट्र, समाज व संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी ही नागरिकांची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक संकेत जोशी यांनी केले,
दिंडोरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन हा सामाजिक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना दिलेल्या सेवेबद्दल तालुक्यातील डॉक्टर, पोलीस कर्मचारी, प्रशासकीयअधिकारी कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी, पत्रकार यांना राखी बांधून सामाजिक उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरे करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा गोसेवा प्रमुख जयसिंग राजपुरोहित, जिल्हा महाविद्यालय विभाग प्रमुख पंकज देशमुख, तालुका कार्यवाह संकेत जोशी, अतुल गायकवाड, मनोज जगताप, दीपक जंगम आदी उपस्थित होते,

फोटो

दिंडोरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन सामाजिक उत्सव पोलीस निरीक्षक अनंता रोग्यांना राखी बांधून साजरा करताना जयसिंग राजपुरोहित, पंकज देशमुख, संकेत जोशी आदी,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button