Amalner

नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचा उद्या अमळनेरात प्रकाशन सोहळा…

नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचा उद्या अमळनेरात प्रकाशन सोहळा…

अमळनेर येथिल सुप्रसिद्ध बँकर, लेखक विश्वास जयदेव ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रोटरी हॉल येथे ८ सप्टेंबर ला सायंकाळी ५ वाजता संपन्न होत आहे.लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर प्रथमच अमळनेरच्या रसिकश्रोत्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल यांचेसह अनेक नामवंत साहित्यिक यांच्या साहित्यिक गप्पांची मेजवानी लाभणार आहे
अमळनेर मधिल साहित्य, संस्कृती चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत नाशिक येथिल विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेले विश्वास ठाकूर यांचे गाजत असलेल्या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन समारंभ अमळनेर येथिल महाराष्ट्र साहित्य परिषद,मराठी वाङ् मय मंडळ, पू सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.अखिल भारतीय मराठी महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होईल .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल तर प्रमुख पाहुणे अहिराणी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णा पाटील, शब्दमल्हार प्रकाशन चे प्रकाशक स्वानंद बेदरकर, सुदाम महाजन,ग्रंथ तुमच्या दारी चे विनायक रानडे,आकाशवाणी चे अनिरुद्ध कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल आबा महाजन यांच्या सत्कार करण्यात येणार आहेत.याप्रसंगी उपस्थित साहित्यिकांच्या साहित्यिक गप्पांचा लाभ अमळनेर च्या रसिकांना होणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करून साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे असे आवाहन सदर प्रकाशन सोहळ्याचे संयोजक म सा प चे कार्यवाह रमेश पवार,म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय अध्यक्ष दिलीप सोनवणे,गौरीसुत प्रतिष्ठाण चे संदिप घोरपडे, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रणजित शिंदे,धनदाई महाविद्यालयाचे प्रा लिलाधर पाटील ,सानेगुरुजी ग्रंथालय चे सचिव प्रकाश वाघ तसेच कार्यक्रम आयोजक लेखक व युवा उद्योजक वेदांशु पाटिल आदिंनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button