sawada

सावद्यातील एका अवैध बायोडिझेल पंप मालकवर गुन्हा दाखल करणेकामी रावेर तहसीलदार यांना पडला विसर

सावद्यातील एका अवैध बायोडिझेल पंप मालकवर गुन्हा दाखल करणेकामी रावेर तहसीलदार यांना पडला विसर

युसूफ शाह सावदा

सावदा : सावदा जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे एक नव्हे दोन अवैध बायोडिझेल पंप मात्र महसूल विभागाची अजब किमिया एकाकडे रावेर रोडवरील बायोडिझेल पंप मालकावर अद्याप कोणतीच कारवाई न करता दुसरीकडे फक्त झुलेलाल बायोडिझेल पंप मालक निरज खेमचंद जैसवाणी रा. जळगांव यांच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात पुरवठा निरीक्षक तहसीलकार्यालय रावेर यांनी दि. ६ ऑगस्ट रोजी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई पूर्ण केली. यामुळे रावेर तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद व न्यायाला अनुसरून नाही. त्यांची कर्तव्यदक्षता आणि तत्परता वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून याप्रकरणी डोळे बंद करून दूध पिण्याचा प्रकार उघडपणे निदर्शनास येत असून रावेर तहसीलदारांना या एका पंप मालकावर गुन्हा दाखल करण्याचा जाणीवपुर्वक विसर पडला की काय हा विषय जनता मध्ये चर्चेला जात आहे.

सबब यासर्व गलथान व कुचकामीपणे चालत असलेल्या भोंगळ कारभाराची गंभीरतापूर्वक तक्रार लवकरच थेट आता जिल्हाधिकारी जळगांव व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे काही स्थानिक जागरूक नागरिक दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आलेली आहे.

तसेच विनापरवानगी पंप टाकून अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा गेल्या १८ दिवसांपूर्वी उघडकीस आला असूनही जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव ते रावेर तहसीलदार सदरील पंप मालकावर कायदेशीर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक किंवा कसे विलंब व दुर्लक्ष करीत एक प्रकारे थेट चोराला पाऊलखुणा नष्ट करण्याची संधी देत आहे.

तसेच गुन्हा दाखल करणेकामी महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब न लावता वेळेवर कायदेशीर कारवाई केली असती तर आज मोकाट फिरण्या ऐवजी झुलेलाल बायोडिझेल पंप मालकास पोलिसांनी अटक केली असती. याला कारणीभूत कोण? तसेच रावेर रोडवरील अवैध बायो डिझेल पंप मालक विरुद्ध कारवाईसाठी विलंब म्हणजे पूर्वीप्रमाणे संबंधित यंत्रणेची भूमिका जैसे थे ची ठेवणे मागचे कारण काय?

याप्रकरणी रावेर ते जळगांव दरम्यान महसूल विभाग व दोन्ही पंप चालक यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होती व आहे.

मात्र बायोडिझेलची विक्री व त्याचा शिल्लक साठा, सदर बायोडिझेल रॉकेल मिश्रित तर नाही ना म्हणून त्याचे नमुने सॅम्पल तपासणी होणे गरजेचे आहे. कारण की राज्यात रॉकेल बंदी मात्र रॉकेल मिश्रित बायोडीजल विक्रीचा प्रकार रावेर येथे उघडकीस आलेला आहे.या पंप चालकांना बायोडिझेलचा पुरवठा कोण व कसा करीत होता. झुलेलाल बायोडिझेल पंप भाड्याची जागा घेऊन गुप्त पद्धतीने चालत होता ती जागा कोणाची? या दिशेने पुढील तपास पोलिसांकडून झाल्यास यात आरोपी संख्या मध्ये निश्चित वाढ होतील हे मात्र खरे आहे. तसेच याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button