Surgana

जिल्हा अधिकारी कार्यालय येते मुख्यमंत्री यांच्याशी संवाद कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातून शिक्षक प्रतिनिधी रतन चौधरी यांनी मांडले प्रश्न

जिल्हा अधिकारी कार्यालय येते मुख्यमंत्री यांच्याशी संवाद कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातून शिक्षक प्रतिनिधी रतन चौधरी यांनी मांडले प्रश्न

विजय कानडे

आज दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी मा.ना.महोदय मुख्यमंत्री सो यांचा संवाद (video conference) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी/ उप शिक्षणासाठी श्री. धनंजय कोळी साहेब यांनी
सुरगाणा तालुक्यातून – शिक्षक प्रतिनिधी रतन चौधरी यास पाठविण्यात आले होते.यावेळी त्यांनी खालील प्रश्नावर चर्चा केली.
मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या दुरुस्ती निधी मंजूर करणे.
नवीन वर्ग खोल्या मंजर करणे
अशैक्षणिक कामे बंद करणे.
पोषण आहार योजना सेंट्रल किचन यंत्रणे मार्फत राबविणे.
आदिवासी भागातील गुजरात सीमेलगतच्या भागात स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण देणे..५०℅ वापर. १ली ते ४थी. करीता.
जिल्हा करीता अजून एक नवोदय विद्यालय सुरु करणे.
आदिवासी भागात स्वतंत्र
क्रिडा प्रबोधिनी सुरु करणे.
सुसज्ज जिल्हा परिषदे मार्फत मराठी- इंग्रजी माध्यमाची शाळा निवासी शाळा सुरु करणे.
पेसा क्षेत्रातील शालेय नियंत्रक अधिकारी यांचे रिक्त पदे प्राधान्य क्रमाने भरावेत.
आदिवासी भागात स्री शिक्षिकांची संख्या वाढवावी.
प्रत्येक शाळेला वाॅल कंपाऊंड मंजूर करावे.
केंद्र शाळेत लेखनिक नियुक्ती करावेत.
वर्षानुवर्षे रखडलेल्या पदोन्नती देण्यात यावी.
आदिवासी पेसा क्षेत्रातील रिक्त जागेवर स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे.
गणवेश अनुदानात वाढ करावी.
मध्यान्ह भोजनात किराणा माल शासना मार्फत करावा.
सर्व शिक्षा अभियान षटकोनी इमारती निर्लेखित करावे.
शालेय गणवेश अनुदानात वाढ करण्यात यावी.
आदिवासी भागात विज्ञान, गणित विषय शिक्षकाची रिक्त पदे भरावेत.
पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी.
आजच्या युगात विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून प्राथमिक शाळेत संगणक संच पुरवावेत.
शाळेत वीजपुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी सौर ऊर्जेचा संच बसवावेत. वीज बिल भरणे साठी तरतूद करावी.अहिल्याबाई होळकर एस. टी. बस पास सवलत योजना विद्यार्थ्यांप्रमाणे मुलांना ही सवलत मिळावी. या सह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी जिल्ह्याधिकारी मा. गंगाथरण डी. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, शिक्षणाधिकारी भास्कर कनोज साहेब सह जिल्ह्यातील पंधरा शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button