Nashik

नासिक जिल्ह्यातीलदिंडोरी तालुक्यात पावसाळी वातावरण:- द्राक्षे पंढरी हादरली,रब्बीवर अवकाळीचे संकट

नासिक जिल्ह्यातीलदिंडोरी तालुक्यात पावसाळी वातावरण:-
द्राक्षे पंढरी हादरली,रब्बीवर अवकाळीचे संकट

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

दिंडोरी सह तालुक्यात सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षे पंढरीतील बळीराजां हतबल झाला असुन गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व आज काही ठिकाणी पा्ऊस सुरू झाल्याने शेतकरी हवाली दिल झाले
सोमवारी दुपार नंतर आकाशात ढगांचा समुह व नंतर ढगाचा गडगडाट होऊ लागल्याने आता रब्बी हंगाम काढणीला सुरुवात झाली असतांना अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने संपूर्ण दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या असुन गेल्या दोन वर्षे कोरीव व आता निसर्ग पुन्हा आपले रंग दाखवलेले नेमके करायचे काय एक बाजुला वेळेवर विजय पुरवठा बिले वसुली कर्ज वसूली आणी त्यात पाऊस याने शेतकरी अधोगती कडे चालले असून नैराश्य भावना निर्माण झाली आहे
सध्या दिंडोरी तालुक्यात गहु सोंगणीला प्रारंभ झालेला आहे. तसेच अनेक तारे वरची कसरत करून द्राक्षे बागा तयार केल्या . त्यात द्राक्षाला भाव नाही, व्यापारी वर्ग बागेकडे वळून पाहात नाही. जरी व्यापारी आले तरी मनासारखा भाव मिळत नाही. व बाजार भाव नाही व दिलाच तर व्यापारी पैसै मिळतील याची शाश्वती नाही अशात पैसे मिळतात शाश्वत नाही अवकाळी पावसांचे वातावरण तयार झाल्याने आता पुढे काय ? असा प्रश्न बळीराजांसमोर ” आ ” वासुन उभा राहिला आहे.
मागील हंगामात अवकाळी मुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असतांना आता कुढे विविध संकटातून सावरलेला बळीराजां आजच्या अवकाळी वातावरणांमुळे बळीराजांच्या समोर एक बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

अचानक वातावरणात बदल झाल्याने दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पंढरी हादरली असुन आता परत रब्बी हंगामावर अवकाळी वातावरणांचा घाला निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजांला कोणताचा हंगाम भरवशांचा न राहिल्याने पिक उभे करण्यासाठी विविध ठिकाणाहून घेतलेले कर्ज, कसे फेडावे या विवेचनेत सध्या तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला
आज अगोदर जोरदार वारे.
ढगांचा गडगडाट
आकाशात विजाचा भयानक विचित्र आवाजाचे वातावरण
सोंगणीला आलेला गहु जोराच्या वा-याने आडवा पडल्याने बळीराजां हतबल.सोंगणीला मोठ्या प्रमाणावर आडकाठी येण्याची शक्यता.
द्राक्षे काढणी चालू असताना अचानक वातावरण बदल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर धावपळ.
लखमापुर, दिंडोरी, करजवंण,अक्राळे,तळेगाव, परमोरी, दहेगाव, इ.परिसरात पावसांचे आगमन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button