Rawer

के-हाळा बु येथील रेशन दुकान नं 105 व 101 या धान्य दुकानाची चौकशी करा नागरीकाची मागणी..

के-हाळा बु येथील रेशन दुकान नं 105 व 101 या धान्य दुकानाची चौकशी करा नागरीकाची मागणी..

भुषण महाजन रावेर

के-हाळा : राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या अन्नधान्य पुरवठा करणा-या योजना अंमलात आणून धान्य पुरवठा करण्यात येतो. धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र हीच यंत्रणा बहुतांश ठिकाणी पळवाटेच्या माध्यमातून पारदर्शक काम करत नसल्याचे समोर आले आहे. रावेर तालुक्यातील के-हाळा गावातील रेशन नं 105 व 101 दुकानाच्या दर्शनी भागावर धान्य परिमाण व दर फलक डकविण्यात आले नसून ते अडगळीला पडले आहेत तर रेशनिंग दुकान धारक सवडीप्रमाणे दुकाने सुरू ठेवत असल्याचा सुर गवसत आहे .तसेच या दुकानादार दरमहा बिपील कार्ड धारक व अन्तोदय कार्ड धारक याना किती धान्य वाटप करतात एका कुटुंबाला किती धान्य देतात तसेच रेशन धारकाला पैसे घेतल्यानंतर पावती देतात का या सर्व गोष्टी ची चौकशी ची मागणी जोर धरत आहे .
राज्य शासना मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत अंत्योदय कुटुंब योजना, प्राधान्य कुटुंब योजना, केशरी (एपीएल) कार्डधारक व अन्नपूर्णा योजना कार्यान्वित आहेत. अंत्योदय योजनेत कार्ड धारक लाभार्थ्यांना २३ किलो गहू तर १२ किलो तांदूळ देण्यात येतो. प्राधान्य कुटुंब योजना व केशरी कार्ड धारक शेतकरी कुटुंबांना प्रति मानसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र अन्नपूर्णा कुटुंब योजना ही लाभार्थ्यांविना बंद आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला धान्य पुरवठा होतो. परंतु बहुतांश रेशन दुकान धारकांकडून नागरिकांना शासनाच्या कुठल्याही योजनेची माहिती दिली जात नाही. तसेच गावात स्वस्त धान्य दुकान धारकांनी शासनाकडून उपलब्ध झालेले स्वस्त धान्य दुकानामार्फत शिधापत्रिका निहाय धान्य परिमाण व दर फलक अडगळीला टाकले असल्याचे दिसून आले. कांही ठिकाणच्या दुकानात डकविण्यात आलेल्या सदर फलकावर धान्य वाटप संदर्भात कांही तक्रार करावयाची असल्यास कोणत्या टोल फ्री अथवा हेल्पलाईन वरती करावी.

यासंदर्भात कांहींही माहिती नोंदविण्यात आली नाही. रेशन दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी विशिष्ट ठराविक वेळ देण्यात आला असला तरी त्याचे पालन होतानाचे दिसत नाही. सदर दुकान धारक आपल्या सवडीनुसार दुकाने उघडणे व बंद करणे ठरवितात त्यांना विचारणा केल्यास धान्य संपले, नंतर या असे सांगितले जात असल्याचे एका कार्ड धारकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कांही दुकानात धान्य मोजण्यासाठी जुन्या पद्धतीचा वजन काटा (तराजू) चा वापर करण्यात येतो तर कांही दुकान धारक इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करतात. मात्र सदर दुकान धारकांकडून वजन दाखविणारी स्क्रीन लाभाथ्यार्ना दिसूच देत नाहीत त्यामुळे वजनात घोळ आल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आहेत. पॉज मशीनच्या सा ाने धान्य वितरण करण्यात येत आहे
शासणाच्या नियमा नुसार
दुकानदाराच्या नावाने फलक असला पाहिजे : मात्र सर्व नियम धाब्यावर बसवुन आपली मनमानी सुरू आहे
स्वस्त धान्य दुकानावर दुकान धारकाच्या नावाचा फलक असला पाहिजे व आत साठा फलक तसेच दर फलक लावणे दुकान धारकास बंधनकारक आहे. जो रेशन दुकान धारक सदरील नियमांचे पालन करणार नाही त्यांची माहिती घेऊन प्रारंभी त्यांना त्या प्रकारच्या सूचना देऊन नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने या दोन्ही दुकानाची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात यावी ,अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे …..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button