Usmanabad

२ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते चेअरमन अभिजीत पाटील

२ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते चेअरमन अभिजीत पाटील

रफिक अत्तार उस्मानाबाद

उस्मानाबाद : धाराशिव साखर साखर कारखाना लि.युनिट१ चोराखळी, उस्मानाबादच्या कारखान्याच्या ८व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख व मित्रपरिवार उपस्थितीत शनिवार दि.०२ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आला. जो शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊस जपून कारखाना जगवतो, त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते पोती पुजन करताना मनस्वी आनंद झाला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांना कधीच मान सन्मानाची अपेक्षा नसते. परंतू शेतकऱ्यांच्या मुलांनी कारखाना जवळून पाहावा. आपला ऊस कारखाना कारखान्यास आल्यास गव्हाणीपासून ते साखर निर्मिती पर्यंत सगळी प्रकिया चेअरमन अभिजीत पाटील यांनी कारखाना दाखवला. गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखाना हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन, तोडणी-वाहतूक यंत्रणेची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे. चालू हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. यागळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करून यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी हंगामातील कामगिरी बद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button