एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आर्डी अनोरे ग्रुप ग्रामपंचायत चा जाहीर पाठिंबा
अमळनेर येथे एस टी कर्मचाऱ्यांचा आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन सुरू आहे. आता पर्यंत अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.आर्डी अनोरे ह्या ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने एस टी. महा मंडळाच्या आंदोलनाला व संपास सर्वानुमते पाठींबा देण्यात येत असून प्रवाश्यांची गैरसोय आणि कर्मचा-यांच्या
समस्या सोडवून त्यांना राज्य शासनात विलगीकरण करण्यात याव अशी विनंती आगार प्रमुख महा राज्य परिवहन मंडळ यांना करण्यात आली आहे.