Nashik

राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानामुळे दिंडोरीत निदर्शने

राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानामुळे दिंडोरीत निदर्शने

सुनील घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

दिंडोरी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत श्री समर्थ साहित्य संमेलन कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी आपल्या भाषणावेळी “चाणक्या शिवाय चंद्रगुप्त , समर्था शिवाय शिवाजीला कोण विचारेल” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
शिवसेना दिंडोरी तालुक्याच्या वतीने (दि. 3) रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या व जाहीर निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, मा.आ.धनराज महाले, दिंडोरी नगराध्यक्षा मेघा धिंदळे, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, कैलास पाटील, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, युवा सेनेचे निलेश शिंदे,नारायण राजगुरु, शहर प्रमुख संतोष मुरकुटे, सुरेश देशमुख,उप ता.प्रमुख विजय पिंगळ, रावसाहेब जाधव, शिवराज गोडसे,अमोल कदम, अविनाश वाघ,अशोक निकमआधी बहुसंख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
नारायण राजगुरु
दिंडोरी सोशल मिडिया ता.प्रमुखङं

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button