Indapur

बावडा येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे -कु. अंकिता पाटील

बावडा येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे -कु. अंकिता पाटील

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील रूग्णालयाची इमारत गेल्या दोन वर्षापासून बांधून तयार असून ही अजूनही या रुग्णालय येथे सरकारने कोणतीही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व किंवा इतरांची नेमणूक केलेली नाही. दि १२ मे २०२० रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रसंगी हा प्रश्न कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित करून हे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली होती. आज दि.१३मे रोजी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या इमारतीची पाहणी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच श्री. किरण पाटील, उप सरपंच निलेश घोगरे व बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. वाघमारे यांच्यासमवेत केली.
सध्या परराज्यातील अनेक कामगार लोक व इतर नागरिक इंदापूर तालुक्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या नियमानुसार त्यांना 14 दिवस Qquarantine (वॉरन्टीन्) करण्याची सुविधा आपण येथे उपलब्ध करू शकतो किंवा संशयित रुग्णांना किंवा बाधित रुग्णांना प्राथमिक उपचार देखील येथे होऊ शकते या दृष्टिकोनातून रुग्णालया लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button